अबब... मंत्रालयात 45 लाखांचे दालन! 

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - लोकशाहीचे न्यायमंदिर असलेल्या मंत्रालयात एका दालनाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 45 लाख 18 हजार 684 रुपयांचा खर्च करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती सामोरी आली आहे. मंत्रालयाच्या विस्तार इमारतीतल्या सहाव्या मजल्यावरील 618 क्रमांकाचे हे दालन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांचे असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुबेराला लाजवेल अशी श्रीमंती या दालनाच्या नूतनीकरणावर उधळली आहे. याबाबत या दालनात बसणारे विद्यमान प्रधान सचिवही हवालदिल झाले असून, या खर्चाची सखोल माहिती घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली; तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. ए.

मुंबई - लोकशाहीचे न्यायमंदिर असलेल्या मंत्रालयात एका दालनाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 45 लाख 18 हजार 684 रुपयांचा खर्च करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती सामोरी आली आहे. मंत्रालयाच्या विस्तार इमारतीतल्या सहाव्या मजल्यावरील 618 क्रमांकाचे हे दालन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांचे असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुबेराला लाजवेल अशी श्रीमंती या दालनाच्या नूतनीकरणावर उधळली आहे. याबाबत या दालनात बसणारे विद्यमान प्रधान सचिवही हवालदिल झाले असून, या खर्चाची सखोल माहिती घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली; तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. ए. सगणे यांनी संबंधित दालनावर झालेल्या खर्चाची भरारी पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. 

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर डिसेंबर 2014 मधे विस्तार इमारतीतले 618 क्रमांकाचे दालन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठी विभागातर्फे दहा लाखांच्या खर्चाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, मंत्रिमहोदयांना दुसरे दालन मिळाल्याने हे 618 क्रमांकाचे दालन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले. पाच जानेवारी 2015 मध्ये नव्याने दालनाच्या नूतनीकरणाचा कार्यादेश देण्यात आला. 

मोजमाप पुस्तिकेतल्या नोंदीवरून या दालनासाठी पाच जानेवारी 2015 ते दहा ऑगस्ट 2015 दरम्यान बारा कार्यादेश काढून चौदा प्रकारच्या सुविधांसाठी तब्बल 45 लाख 18 हजार 684 रुपयांचा खर्च मंजूर केला. हे बारा कार्यादेश काढतानाही "ई-टेंडरिंग'ला फाटा देण्यासाठी तीन लाखांच्या आतल्या रकमा मंजूर करत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतापच केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. 

वाढता वाढे खर्च... 
स्वच्छतागृह : 2,95,164 
स्टोरेज युनिट सोफा : 2,97,801 
सिटर सोफा : 2,98,250 
फर्निचर व खुर्ची : 2,88,174 
अकॉस्टिक वॉल पॅनेलिंग : 2,96,589 
वूडन फ्लोअरिंग व वॉल पॅनेलिंग : 2,98,317 
वूडन फ्लोअरिंग : 2,99,779 
केबिनचे फ्लोअरिंग : 2,98,457 
अँटी चेंबर : 2,98,600 
स्टाफ रूम : 2,90,146 
केबिन नूतनीकरण : 2,89,918 
मीटिंग हॉल : 4,98,485 
अँटी चेंबर नूतनीकरण : 4,98,212 
(सर्व आकडे रुपयांत) 

Web Title: maharashtra news sakal