"फूल टू स्मार्ट'मधून माहिती व बक्षिसांचा खजिना! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - विद्यार्थ्यांच्या आवडीचे व त्यांना उपयुक्त माहितीच्या माध्यमातून "स्मार्ट' बनविणारे "फूल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ'तर्फे विद्यार्थ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहे. माहिती संकलनाबरोबर बक्षिसांचा भरगच्च खजिनाही यानिमित्ताने लुटता येणार आहे. 

पुणे - विद्यार्थ्यांच्या आवडीचे व त्यांना उपयुक्त माहितीच्या माध्यमातून "स्मार्ट' बनविणारे "फूल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ'तर्फे विद्यार्थ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहे. माहिती संकलनाबरोबर बक्षिसांचा भरगच्च खजिनाही यानिमित्ताने लुटता येणार आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी "सकाळ' महाराष्ट्र आणि गोव्यातील दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी हे सदर घेऊन येत आहे. माहिती, विज्ञान, मनोरंजन, खेळ यांवर आधारित हे सदर गुरुवारपासून (ता. 28) पुढील 100 दिवस प्रसिद्ध होणार असून, एकूण सव्वा कोटी रुपयांची 55 हजारांपेक्षा अधिक बक्षिसे हे स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल. महत्त्वाचे म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास हमखास बक्षीस व सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईसाठी एक स्कूटी पेपचे बंपर प्राइझ जिंकण्याचीही संधी "सकाळ'च्या या स्पर्धेमुळे मिळणार आहे. एकूण 18 विद्यार्थ्यांना स्कूटी पेप जिंकता येईल. 

या वर्षी "टेक्‍नोहंट' या सदराच्या माध्यमातून विज्ञानातील गमती-जमती अनुभवता येणार आहेत, तर "स्लॅमबुक'मधून खेळ, मनोरंजन, संशोधन अशा विविध क्षेत्रांतल्या विद्यार्थ्यांचे उद्याचे आदर्श असणाऱ्या तरुणाईची माहिती दिली जाणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषासमृद्धीसाठी "मनोविकास' हे सदर आहेच. हे सर्व करत असताना शरीराचे स्वास्थ्य टिकविणेही तितकेच गरजेचे आहे. "किप फिट' हे सदर मुलांना तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल. परिसरातील विविध पक्ष्यांची नावे व वैशिष्ट्ये "किलबिल' या सदरातून जाणून घेता येतील. दर रविवारचे पान खास पालकांसाठी असून, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्यासाठी "संपन्न व्यक्तिमत्त्व' या सदरातून महत्त्वाच्या टिप्स दिल्या जाणार आहेत. शाळांत होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती ""प्रयोग'शाळा' सदरातून खुसखुशीत पद्धतीने दिली जाणार आहे. 

रोज एक कुपन 
मित्रांनो, या भरगच्च माहितीबरोबर याच माहितीवर आधारित असलेला एक प्रश्‍न विचारणारे एक कुपन शंभर दिवस याच पानात प्रसिद्ध होईल. हे कुपन म्हणजे तुमच्या हातातली 55 हजारहून अधिक बक्षिसांची किल्ली आहे, बरं का! तुम्हाला या कुपनमध्ये विचारलेल्या प्रश्‍नाचे अचूक उत्तर लिहून ते कुपन शाळेतून मिळालेल्या प्रवेशिकेवर चिकटवायचे आहे. यासंबंधीची अधिक माहिती तुम्हाला त्याच प्रवेशिकेमध्ये मिळेल. 

महाराष्ट्र आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवड करण्यात येईल. पहिले बक्षीस म्हणून 90 विद्यार्थ्यांना गिअरच्या सायकली जिंकण्याची संधी आहे. दुसरे बक्षीस आहे टॅब आणि तो मिळेल 180 विद्यार्थ्यांना. तिसरे बक्षीस म्हणून 720 ट्रॅव्हल ट्रॉली बॅग आहेत. चौथे बक्षीस रिस्ट वॉच असून ते एक हजार विद्यार्थ्यांना व पाचवे बक्षीस दोन हजार स्पोटर्स कूल बॉटल आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाच्या प्रमाणपत्राबरोबर स्पोर्टस बॅग बक्षीस म्हणून मिळणार आहे. तेव्हा तयार आहात ना, माहितीचा आणि बक्षिसांचा खजिना लुटण्यासाठी...! 

Web Title: maharashtra news sakal full 2 smart student