थेट सरपंच निवडीसाठी अधिवेशनात अध्यादेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारपासून (ता.24) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश ठेवण्यात येणार आहे. 

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांत नगरध्यक्षाला जनतेतून निवडून द्यायचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याच धर्तीवर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. यासाठी विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश ठेवण्या येणार आहे. सुरवातीला अध्यादेश ठेवल्यानंतर अधिवेशन संपण्याच्या आधी स्वतंत्र विधेयक मांडावे लागणार आहे. या विधेयकावर विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा होणार असून विरोधकांकडून त्यास कडाडून विरोध होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील अधिवेशनापर्यंत अध्यादेश लागू होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत कोणताही व्यत्यय येणार नाही. त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाच्या हक्काबाबत विधेयकही पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

Web Title: maharashtra news sarpanch Rainy season