राज्यातील १४ हजार शाळा अंधारात

बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - केंद्र व राज्य सरकारने ‘डिजिटल इंडिया’चा डांगोरा पिटला असला तरी राज्यातील भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यातील १३ हजार ८४८ शाळांमध्ये अद्यापपर्यंत वीजच पोहचली नसून, तब्बल ४४ हजार ३३० शाळातील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय याचा गंधही नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 

‘युनिफाइड डिस्ट्रिक्‍ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन’ या संस्थेने दिलेल्या अहवालातील वास्तवामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

यंदाच्या वर्षात वीज नसलेल्या शाळांची आणखी ७४२ ने भर पडल्याची माहितीही अहवालातून दिसून येते. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चूनही हजारो शाळांतील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहिले असून, त्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी समर्थन संस्थेने राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी वारंवार संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

वीज बिलासाठी  केवळ ३०० रुपये
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत संगणक अनुदान मिळालेल्या शाळांना वीज बिलासाठी महिन्याला ३०० रुपये दिले जातात. यात वाढ करण्याची मागणी संस्थाचालकांनी करूनही त्यात वाढ झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: maharashtra news school digital india