शुल्कवसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याने शाळेला दणका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - अतिरिक्त शुल्कवाढीच्या वसुलीसाठी मुलांना वर्गाबाहेर काढणाऱ्या माहीमच्या सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटीला आता जिल्हाधिकारी कार्यालयातूनही दणका मिळाला आहे. शाळेने सुरू केलेली अतिरिक्त 25 टक्के शुल्कवाढ जिल्हाधिकारी कार्यालयाने रद्द केली आहे. 

शुल्कवाढीसाठी मुलांना वेठीस धरून वर्गाबाहेर तासन्‌ तास बसवल्याप्रकरणी नितीन वाघमारे व मकरंद काणे या पालकांनी राज्य बालहक्क आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राज्य बालहक्क आयोगाने सरस्वती विद्यालयाच्या प्रशासनावर कारवाई करण्याच्या सूचनाही शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिली होती. हे प्रकरण सुरू असतानाच वाघमारे यांनी राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडेही सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना राष्ट्रीय बालहक्क आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या होत्या. 

या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अहवाल मागवला. या अहवालात सरस्वती सेकंडरी स्कूलची अतिरिक्त शुल्कवाढ चुकीची असल्याचे नमूद करण्यात आले होते. पालकांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क पुढच्या परीक्षांच्या शुल्कात समाविष्ट केले जावे, अशा सूचनाही मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल मेहता यांनी राष्ट्रीय बालहक्क आयोगाला पाठवला आहे.

Web Title: maharashtra news school student Charge fee