शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या बाहेर आहोत. शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावा लागले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

मुंबई - आम्ही कॅबिनेट बैठकीत जाणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, की कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या बाहेर आहोत. शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावा लागले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. कर्जमाफीचा तपशील ठरविताना शिवसेनेला घ्यावेच लागेल. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय तो मान्य होणार नाही. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये. कोणीही शिवसेनेला दमबाजी करू नये. ती आम्ही खपूवन घेणार नाही. आम्ही डगमगत नाही. सरसकट कर्जमाफी व्हावी ही आमची मागणी आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​

Web Title: maharashtra news shiv sena leader subhash desai talked about farmer strike