सौर कृषिपंप योजनेच्या अटी शिथिल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - सौर कृषिपंप योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी अटी शिथिल करण्यात आल्या असून, ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे क्षेत्र दहा एकर आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा फायदा घेऊन ज्या विहिरींवर सौरपंप दिला आहे तेथे सौर कृषिपंप लागल्यानंतर दहा वर्षांनंतर मागणी केल्यास महावितरणमार्फत विद्युतपुरवठाही देण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. 

बावनकुळे म्हणाले, सदर प्रकल्प पायलट स्तरावर राळेगण सिद्धी येथे यशस्वी झाल्यावर त्यासाठी येणारा अत्यल्प खर्च बघता ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शासनाकडे सहा हजार 511 सौर कृषिपंप उपलब्ध आहेत. कोकणातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करून दिले जातील. 

Web Title: maharashtra news Solar Agricultural Pumps farmer