सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सव्वाशे केंद्रे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदीसाठी पणन महामंडळाकडून राज्यातील 23 जिल्ह्यांत 125 ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव "नाफेड'कडे देण्यात आला आहे. या केंद्रांच्या माध्यमातून 18 ऑक्‍टोबरपासून किमान आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे, तर मूग आणि उडदाची खरेदी 16 ऑक्‍टोबरपासून करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. 

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पणन महामंडळाकडून सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव "नाफेड'कडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ही केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून जवळपास 35 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी अपेक्षित आहे. मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी तीन ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. याच केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अशी केंद्रे उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी दोन दिवसांत म्हणजे 11 ऑक्‍टोबरपासून सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी नवीन केंद्रे सुरू करण्यात येतील. 

Web Title: maharashtra news soyabean farmer

टॅग्स