बोलणी फिस्कटल्याने एसटीचा संप सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमवारी झालेली कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ ठरल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ऐन दिवाळीत संप केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेण्याचा निर्णय घेतला; परंतु सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतेही आश्‍वासन न मिळाल्याने एसटी कामगार संघटनांनी संप करण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले. एसटीच्या 99 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संपावर जाण्याचे ठरवले. संपातून माघार घेतल्यास कर्मचाऱ्यांचा विश्‍वासघात होईल, असे महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news st bus strike