एसटीच्या सर्व बसमध्ये ऑक्‍टोबरपर्यंत वायफाय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - मुंबईसह देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय हॉटस्पॉट सेवा दिली जात असतानाच एसटी महामंडळानेही एसटी बसमध्ये वायफाय सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत एसटीच्या 5,900 बसमध्ये वायफाय बसवण्यात आले आहे. प्रवाशांनी त्याद्वारे बॉलिवूड चित्रपट पाहण्यास अधिक पसंती दिली आहे. ऑक्‍टोबर 2017 पर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये ही सुविधा दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

सुखकर प्रवासासह प्रवाशांची करमणूक व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. त्याचे काम यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीला देण्यात आले. एसटी महामंडळाकडे सध्या 18 हजार बस आहेत. त्यातील 5,900 बसमध्ये वायफाय बसवण्यात आले आहे. यात निवडक अशा मराठी, हिंदी चित्रपटांसह गाणी, कॉमेडी मालिका असून प्रवासी यातील कोणताही पर्याय निवडून आपल्या मोबाईलवर ते पाहू शकतात. 100 हिंदी चित्रपट, 20 ते 25 मराठी चित्रपट, 20 अन्य भाषिक चित्रपट आणि पाच ते सात मालिकांचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे. प्रवाशांनी हिंदी चित्रपटांना अधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मराठी चित्रपटांसह डब केलेल्या अन्य भाषिक चित्रपटांचा क्रमांक लागतो. एसटी महामंडळाने संबंधित कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. या कंपनीकडून एसटी महामंडळाला दर वर्षी 1 कोटी 5 लाख रुपये मिळणार आहेत. 

दिवसाला एका बसच्या प्रत्येक फेरीमागे 10 ते 12 प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. सहा महिन्यांत 16 लाख हिट्‌स मिळाले. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, धुळे, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि सांगलीतून सुटणाऱ्या काही बसमध्ये वायफाय हॉटस्पॉट सुरू आहे. 

ऑक्‍टोबरपर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये वायफाय हॉटस्पॉट सुविधा दिली जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांची चांगली करमणूक होत आहे. 
- नितीन कानुंगो,  व्यवस्थापकीय संचालक, यंत्र मीडिया सोल्युशन

Web Title: maharashtra news st bus wi-fi

टॅग्स