'दिवाळीनंतर गाळप परवाने'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 193 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी ऑनलाइनद्वारे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांच्या छाननीचे काम आयुक्तालयात सुरू आहे. दिवाळीनंतर परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या सर्व साखर कारखान्यांना एकाच वेळी गाळप परवाने वितरीत करणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिली. 

राज्यात चालूवर्षी एकूण 722 लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. त्यापैकी प्रत्यक्ष गाळपासाठी 649 लाख मे.टन ऊस उपलब्ध होईल; तर सरासरी 11.30 टक्के साखर उताऱ्यानुसार 73 लाख 39 हजार मे.टन साखर उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे. चालूवर्षी ऊस गाळप हंगाम घेणाऱ्या कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. त्यानुसार राज्यातील सात विभागातील प्रादेशिक साखर सह संचालकांकडे प्रस्ताव दाखल होणे अपेक्षित होते. त्यांच्या पातळीवरील छाननीनंतर ते आयुक्तालयात येत असतात. 

अहमदनगर विभागात 27, अमरावती 3, औरंगाबाद 23, कोल्हापूर 38, नागपूर 4, नांदेड 33, पुणे विभागात 65 मिळून गाळप परवान्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये सद्यःस्थितीत 100 सहकारी आणि 93 खासगी कारखान्यांच्या ऑनलाइन प्रस्तावांचा समावेश आहे. या प्रस्तावांच्या छाननीचे काम सुरू आहे. त्यास एकाच वेळी मंजुरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

राज्यातील ऊस गाळप हंगाम 2015-16 मध्ये 179 कारखाने सुरू होते. तर 2016-17 या वर्षात सुमारे 150 साखर कारखान्यांनी हंगाम घेतलेला आहे. याचा विचार करता ऑनलाइनद्वारे दाखल 193 प्रस्तावांचा विचार करता मागील दोन वर्षांनंतर चालू वर्षी सुरू राहणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरासरी 160 दिवसांच्या गाळप हंगामाचे नियोजन मंत्री समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. चालूवर्षी वाढलेली उसाची उपलब्धता, सुरू होणारे कारखाने अधिक राहिल्यास नियोजित वेळेत ऊस गाळप पूर्ण होईल, अशी यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.  
संभाजी कडू पाटील, राज्याचे साखर आयुक्त 

Web Title: maharashtra news sugar factory