‘हल्लाबोल’ला अभूतपूर्व प्रतिसाद - सुनील तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई - ‘मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनामध्ये सात ते साडेसात लाख लोकांशी संपर्क साधला गेला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

‘राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यामध्ये आंदोलने केली. अभूतपूर्व प्रतिसादानंतर हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता तीन फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर भाषणाने होणार आहे. या वेळी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर शरद पवार जाहीर सभेला संबोधित करतील,’ अशी माहिती त्यांनी दिली. तसेच त्यानंतर ‘हल्लाबोल’च्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव अशी शहरे असून, त्याची सांगता ११ मार्चला होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

कर्जमाफीची यादी फसवीच - सावंत
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचे कितीही दावे केले तरी ही कर्जमाफी अखेर फसवीच असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केला आहे. राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती याचा दाखला देत सावंत यांनी या कर्जमाफीच्या आकड्यांची चिरफाड केली. आजही या कर्जमाफीच्या जाचक अटीमुळे ५० लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे ते म्हणाले.

Web Title: maharashtra news sunil tatkare