टॅबअभावी रखडली पशूंची गणना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - पशुगणना जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान होणार होती; परंतु टॅबलेट न मिळाल्याने ती रखडली आहे. सात हजार प्रगणक सुमारे अडीच कोटी कुटुंबांपर्यंत जाऊन पशुगणना करणार होते. नेहमीपेक्षा ही पशुगणना वेगळी ठरणार होती; परंतु ऑक्‍टोबर उजाडला तरी ती सुरू होऊ शकलेली नाही. दर पाच वर्षांनी ही गणना केली जाते.

एखाद्या कुटुंबाकडे कोणते पशू आहेत? ते किती आहेत? एवढीच माहिती पूर्वी घेतली जात होती. जिल्हावार माहिती मागविल्यानंतर ती केंद्राकडे पाठवली की एक दीड वर्षात हे काम पूर्ण होत असे. आता टॅबवर माहिती टाकल्यानंतर काही तासांत पशुगणना पूर्ण होणार होती. 

या गणनेसाठी सुमारे सहा हजार टॅबलेटची गरज असून, केंद्राने अद्याप त्याच्या खरेदीची निविदा काढलेली नाही. त्यामुळे प्रगणकांचे प्रशिक्षण आणि गणनाही रखडली आहे. 

Web Title: maharashtra news tab bird