ताहिर मर्चंट, करिमुल्ला खानला फाशीची सीबीआयची मागणी 

ताहिर मर्चंट, करिमुल्ला खानला फाशीची सीबीआयची मागणी 

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी ठरलेले ताहिर मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या आणि करिमुल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयतर्फे शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयात करण्यात आली. बॉंबस्फोटांच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याने दोघांनाही मुंबईत काय घडणार आहे, याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी केला. 

दुबईत झालेल्या कटासंदर्भातील बैठकींना ताहिर उपस्थित होता. पाकिस्तानात शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईहून माणसांची जमवाजमव करण्यासाठी त्याने साथीदारांना प्रोत्साहन दिले. शस्त्रांसाठी त्याने पैसाही जमा केला. याशिवाय भारतात शस्त्रनिर्मितीचा कारखाना सुरू केल्याच्या आरोपाखालीही त्याला दोषी ठरविले आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्याचे ताहिरनेच दाऊद व टायगर मेमनच्या मनावर बिंबवले होते. करिमुल्ला खानही कटासंदर्भात झालेल्या विविध बैठकींना उपस्थित होता. स्फोट घडवण्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील शेखाडी बंदरात स्फोटके- शस्त्रास्त्रांचा साठा उतरवण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. शस्त्र प्रशिक्षणासाठी दुबईमार्गे तो पाकिस्तानात गेला होता. आणखी एका मित्रालाही त्याने शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवले. मुंबईत शस्त्र आणि आरडीएक्‍स पाठवण्यासाठी त्याने मदत केली. या स्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनसोबत त्याने काम केले. मोठा शस्त्रसाठा मुंबईत उतरवल्यामुळे काय घडणार आहे, याची त्याला माहिती होती, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com