तंबाखूजन्य पदार्थासोबत अन्नपदार्थ विकण्यास मज्जाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - एकाच दुकानात नूडल्स, चॉकलेट्‌स, बिस्कीट, चिप्ससारख्या लहान मुले आणि युवकांना आकर्षित करणाऱ्या खाद्यपदार्थांबरोबर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य व कल्याण मंत्रालयाने याबाबत राज्य सरकारांना आदेश दिले आहेत. 

अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार कोणत्याही अन्नपदार्थांमध्ये निकोटीनचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळेच यापुढे तंबाखू विक्रीच्या दुकानात इतर खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत; तर किरकोळ दुकानातही तंबाखूजन्य उत्पादने विकता येणार नाहीत, असे अन्न, औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. युवक आणि लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सुगंधी सुपारी विक्रीवरील बंदीत वाढ 
सुगंधी आणि स्वादिष्ट सुपारी विक्रीवरील बंदीला आज अन्न, औषध प्रशासनामार्फत सहा महिन्यांची वाढ करण्यात आली. प्रशासनाने 2013 पासून सुगंधी सुपारीवर प्रतिबंध घातला आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत ही बंदी कायम राहील. याआधीची मुदत जानेवारीत संपल्याने विभागाने याबाबतची घोषणा केली होती.

Web Title: maharashtra news tobacco Avoid selling foods