उदयनराजे यांच्या अटकेचा राज्यभरातून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अटकेचा राज्यात मंगळवारी (ता. 25) ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. बीडमध्ये त्यांच्या समर्थकांनी बसवर दगडफेक केली. उदयनराजे यांना जामीन मंजूर होताच आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच बंद मागे घेण्यात आला. 

बीड - उदयनराजे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीड शहराजवळील चऱ्हाटा फाट्याजवळ एका बसवर दुपारी दोन वाजता काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. 

जामखेड-बीड ही पाटोदा आगाराची बस (क्रमांक एमएच 07 सी 7222) प्रवासी घेऊन बीडकडे येत होती. चऱ्हाटा फाट्याजवळ काही तरुणांनी ही बस अडवल्यानंतर समोरील बाजूने बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसच्या समोरील काच फुटली आहे. चालकाने तशाच अवस्थेत बस बीड आगारात आणून उभी केली. या घटनेने प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर बीड ग्रामीण पोलिसांनी तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, खासदार उदयनराजे सेना या संघटनेतर्फे बुधवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 

परंडा - छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अटकेचा निषेध करत त्यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी सकल मराठा समाजाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. 

छत्रपती घराण्यांवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या भावनांचा शासनाने विचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या समाजकंटकांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. 

इंदापूर - खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेचा इंदापूर येथील छत्रपती परिवाराच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुधवार 

26 जुलै रोजी इंदापूर 
बंदचा इशारा देण्यात आला होता; मात्र न्यायालयाने त्यांना त्वरित जामीन मंजूर केल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून इंदापूर बंद मागे घेण्यात आला. उदयनराजे यांना जामीन मंजूर होताच शहरातील खडकपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व एकमेकास पेढे भरवून जल्लोष व्यक्त करण्यात आला. 

Web Title: maharashtra news udayanraje bhosale Protest