'इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांवर पुढील वर्षापासून बंदी '

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - खासगी शिकवणी वर्गांच्या चालकांशी संगनमत करून कनिष्ठ महाविद्यालयात इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे प्रकार बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अशा अभ्यासक्रमांवर बंदी आणण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता. 28) विधानसभेत केली. 

"नीट' आणि "जेईई' परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. या कनिष्ट महाविद्यालयांचे खासगी शिकवणी वर्गांशी संधान असते. हजेरीची कोणतीही अट न घालता असे प्रकार केले जातात. हा प्रकार गंभीर असल्याचे विधानसभेत निदर्शनास आणण्यात आले. त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, एसएससी, सीबीएसई, आयसीएससी अभ्यासक्रमांत कोणताही फरक नाही, केवळ परीक्षा पद्धतीत फरक आहे. एसएससी परीक्षा पद्धतीत बदल करून नववीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नववीचे पुस्तक बदलण्यात आले आहे. याच अनुषंगाने प्रशांत ठाकूर यांनी, ग्रामीण विद्यार्थी अशा परीक्षा कशा देणार, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर ग्रामीण विद्यार्थ्यांचीही तयारी करून घेतली जाईल, असे आश्‍वासन तावडे यांनी दिले. 

Web Title: maharashtra news vinod tawde education