गुंजवणी प्रकल्पातून शेतीसाठी  बारमाही पाणी

गजेंद्र बडे
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - शेतकऱ्यांना पाइपलाइनद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा नवीन प्रयोग गुंजवणी (ता. वेल्हे) प्रकल्पात साकारण्यात येत आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. त्याला ‘बंद नलिका सिंचन प्रकल्प’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनासाठी ठिबकच्या माध्यमातून बारमाही पाणी मिळणार असून, सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हेक्‍टरपर्यंत मोफत ठिबक करून दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पीआयएन’ (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार हा प्रकल्प आकाराला येत आहे.

केंद्र सरकारने ‘हर खेत को पानी’ अशी घोषणा केली आहे. त्यासाठी धरणांमधून थेट शेतात पाणी पोचविण्याचे आणि ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे बंधन घालणारे धोरण केंद्र सरकारने तयार केले आहे. ते राज्य सरकारने १३ जानेवारी २०१७ रोजी स्वीकारले आहे. त्याला अनुसरून यापुढे धरणांमधील पाणी प्रवाही कालव्यांऐवजी बंद पाइपलाइनद्वारे पुरविण्याचा सरकारचा मानस आहे. त्याची सुरवात पुणे जिल्ह्यातून होत आहे. या बदलामुळे पाण्याचा आणि प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळता येणार आहे. शिवाय कालवानिर्मितीसाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनातही सुमारे एक हजार २५० हेक्‍टरने घट होणार आहे. या संदर्भात पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ म्हणाले, ‘‘नवीन धरण बांधण्यासाठी राज्यात कुठेच जागा आणि पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने आतापर्यंत जी धरणे बांधली आहेत, त्यातील पाण्याचा वापर काटकसरीने करणे अनिवार्य झाले आहे. त्यासाठी बंद नलिका सिंचन धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यातून सिंचनाच्या क्षमतेत सुमारे २० टक्के वाढ होऊ शकणार आहे.’’ 

‘जलस्वराज्याचे तोरणही वेल्ह्यातच’
हनुमंत धुमाळ म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण वेल्हे तालुक्‍यातील तोरणागड येथे बांधले होते. सिंचनासाठी अमलात येत असलेला देशातील पहिला बंद नलिका प्रकल्पही योगायोगाने याच तालुक्‍यातील ‘गुंजवणी’त येत आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जलस्वराज्य येणार आहे. त्याचे ‘तोरण’ही वेल्ह्यातच बांधले जात आहे.’’

Web Title: maharashtra news water agriculture farmer