राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यात गेल्या आठवड्यापासून वाढलेली ऑक्‍टोबर हिट ढगाळ वातावरणामुळे कमी झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस आणि हवेतील वाढलेले बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात मंगळवारी (ता. 10) बहुतांशी ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

सध्या बंगाल उपसागराच्या उत्तर भागात, बांगलादेश व पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता खोल कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, ते पश्‍चिम बंगालच्या परिसरात आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाऊस कमी होण्याचे संकेत मिळत आहे. गुरुवार (ता. 12) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. शुक्रवार (ता. 13) पर्यंत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. 

विदर्भातील नागपूर, अकोला, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह रविवारी जोरदार पाऊस पडला. उर्वरित भागांत ऊन, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. कोकणातील बहुतांश भागांत हवामान ढगाळ होते. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत होते. 

Web Title: maharashtra news weather rain