गहू आयातीवर 20, तर वटाण्यावर 50 टक्के शुल्क लागू - खोत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवर 20 टक्के आणि वटाण्यावर 50 टक्के आयात शुल्क लागू केले आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी गव्हावर दहा टक्के आणि मटारवर शून्य टक्के आयातशुल्क होते. 

राज्यमंत्री खोत पुढे म्हणाले, जगभरातून देशात आयात होत असलेल्या धान्यावर आयात शुल्क वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. विशेषतः पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यात नवी दिल्लीत हा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच याबाबतची माहितीही पटेल यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गहू आयातीवर 20 टक्के आयात शुल्क करण्यात आले आहे. यापूर्वी ते 10 टक्के होते, तर पिवळ्या मटारवर आयात शुल्क 50 टक्के केले आहे. यापूर्वी वटाण्यावर शून्य टक्के आयात शुल्क होते. देशी हरभरा 4 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे, तर पिवळ्या वटाण्याची आयात किंमत 1800 प्रतिक्विंटल इतकी होती. पिवळा वटाणा हरभरा पिठात मिक्‍स केला जात होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील हरभऱ्याला दर मिळत नव्हता. पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात पिवळ्या वटाण्यावर आयात शुल्क लावण्यात आले आहे. 

Web Title: maharashtra news wheat sadabhau khot