दुबईतील खर्चाप्रमाणे पोटगी मागणाऱ्या महिलेची याचिका नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - मुलासह दुबईत राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे घटस्फोटित पतीकडून एक लाख रुपयांची पोटगी मिळावी, अशी मागणी करणाऱ्या उच्चशिक्षित महिलेची याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. 

मुंबई - मुलासह दुबईत राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे घटस्फोटित पतीकडून एक लाख रुपयांची पोटगी मिळावी, अशी मागणी करणाऱ्या उच्चशिक्षित महिलेची याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. 

या महिलेला तसेच तिच्या मुलाच्या खर्चासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वीच तिच्या पतीला दिला होता. मात्र, दुबईत येणारे वीजबिल, घराचा देखभाल खर्च, प्रवासखर्च आदींसाठी ही रक्कम अपुरी आहे. दुबईत राहत असल्यामुळे तेथील खर्चानुसार पोटगीची रक्कम निर्धारित करावी, अशी मागणी महिलेने केली होती. न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे तिच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. 

माझी पूर्वाश्रमीची पत्नी चार बेडरूमच्या आलिशान घरात राहते. तिला चांगले उत्पन्नही मिळते, असे तिच्या पतीने न्यायालयात कागदोपत्री सिद्ध केले. मात्र, मी आणि मुलगा केवळ दोन बेडरूम वापरतो. दोन बेडरूम माझी बहीण वापरते, असा दावा त्या महिलेने केला. तो खंडपीठाने फेटाळला. दुबईत चार बेडरूम असलेल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा आर्थिक स्तर चांगला असू शकतो. संबंधित महिला ग्रीन करही भरते. त्यावरून तिची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे दिसते. त्यामुळे तिला वाढीव पोटगीची आवश्‍यकता नाही, असे मत व्यक्त करत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

Web Title: maharashtra news women court Petition