‘यिन’चे मंत्रिमंडळ आज ठरणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - राज्यभरातील ‘यिन’ परिवाराला उत्सुकता लागून राहिलेले ‘यिन मंत्रिमंडळ’ गुरुवारी (ता. ७) जाहीर होत आहे. मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री आणि जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची घोषणा या वेळी केली जाईल. ‘यिन’च्या मुख्यमंत्रिपदासाठी आज ऑनलाईन मतदान घेण्यात आले. त्यासाठी विविध जिल्ह्यांच्या ग्रामीण व शहर अध्यक्षांनी मतदाराची भूमिका पार पाडली.

मुख्यमंत्रिपदासाठी सात तरुण उमेदवार रिंगणात आहेत. सातही उमेदवारांनी मतदार असलेल्या सर्व जिल्हाध्यक्षांसमोर आपली भूमिका जाहीरपणे मांडली. मलाच मतदान का करावे याबाबत सात जणांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. राज्याचा विकास आपण काय करू शकतो, राज्यातील महिलांसोबतच शेतकरी, तरुणांचे प्रश्‍न कसे सोडवू शकतो आदींची माहिती त्यांनी दिली. एखाद्या राजकीय नेत्यालाही तोंडात बोट घालायला लावेल अशी दूरदृष्टी या तरुणांच्या बोलण्यातून दिसून आली.

मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार?
‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री निवडीसाठी मतदान घेण्यात आले. ‘यिन’च्या तरुणांनी अभिषेक पाटील, अल्फिया छाफेकर, अनिरुद्ध जंगम, नीरज जाधव, सानिका जगदाळे, तेजस पाटील आणि नंदकुमार गायकवाड या सात जणांची ऑनलाईन मते देऊन त्यांची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी निवड करण्यात आली होती. निवडीनंतर हे सातही उमेदवार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्यानंतर त्यांनी आपण ‘यिन’चा मुख्यमंत्री झाल्यास काय करू शकतो, याची माहिती दिली.

Web Title: maharashtra news YIN cabinet will decide today