'उद्योजक घडवणारा अभ्यासक्रम हवा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - नोकरदार न बनवता युवकांमधील उद्योजक घडेल असा परिपूर्ण अभ्यासक्रम ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये असावा. समाजाचा विकास करणारा उद्योजक घडवावा. त्यासाठी त्यांना वित्तपुरवठा, पेटंट, सॉफ्ट स्किल आदी परिपूर्ण माहिती द्यावी. त्याचबरोबर त्यांना विविध क्षेत्रांची तांत्रिक बाजूही समजावून द्यावी, अशी सूचना राज्यभरातून आलेल्या प्राध्यापकांनी केली. 

मुंबई - नोकरदार न बनवता युवकांमधील उद्योजक घडेल असा परिपूर्ण अभ्यासक्रम ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये असावा. समाजाचा विकास करणारा उद्योजक घडवावा. त्यासाठी त्यांना वित्तपुरवठा, पेटंट, सॉफ्ट स्किल आदी परिपूर्ण माहिती द्यावी. त्याचबरोबर त्यांना विविध क्षेत्रांची तांत्रिक बाजूही समजावून द्यावी, अशी सूचना राज्यभरातून आलेल्या प्राध्यापकांनी केली. 

‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेत ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी बुधवारी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासमोर ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची संकल्पना मांडली. प्राध्यापकांनी ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अभ्यासक्रमासाठी विविध सूचना केल्या. शिक्षकांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी प्रोग्रामच्या अभ्यासक्रमासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन पवार यांनी केले. त्याला प्रतिसाद देत प्राध्यापकांनी समूह चर्चा करून काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या.  उद्योग-व्यवसायाच्या संकल्पना आता बदलल्या आहेत. त्यामुळे ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अभ्यासक्रमात मानवी वर्तन शास्त्राचाही समावेश करावा. सध्या अनेक उद्योग हे मानवी वर्तनाशी संबंधित आहेत. त्यामुळे वर्तन शास्त्राचा (बीहेव्हियर सायन्स) समावेशही या अभ्यासक्रमात असायला हवा, असेही प्राध्यापकांनी नमूद केले. व्यवसाय सुरू करताना त्याचा आराखडा कसा तयार करावा, त्यासाठी निधी कसा मिळवावा, नवे तंत्रज्ञान विकसित करून त्यातून उद्योग कसे निर्माण करावेत आदी मुद्देही अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत, अशी सूचनाही प्राध्यापकांनी केली.

‘लीडरशिप प्रोग्राम’ जगभरात पोचवू - पवार 
संगणकावर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकाचे काम वाढले आहे. जे संगणकावर, सर्च इंजिनवर सापडणार नाही ते आता विद्यार्थ्यांना, युवकांना शिकवायला पाहिजे. ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची सुरवात पुण्यातून करून नंतर तो देशभरात, जगभरात पोचवू, असे प्रतिपादन अभिजित पवार यांनी केले. दहा वर्षांपूर्वी जे युवकांना शिकवत होतो तेच आताही शिकवत आहोत. वाहन उद्योग, पत्रकारिता सर्वच क्षेत्रांत बदल होणार आहेत. त्यानुसार कायदेही बदलावे लागतील. त्यासाठी जगभरात कामही सुरू झाले आहे, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news YIN Entrepreneurial course professor