यिनची नेतृत्व विकास परिषद आजपासून 

यिनची नेतृत्व विकास परिषद आजपासून 

मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्कची (यिन) नेतृत्व विकास परिषद आज (ता. ५) यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. 

स्पर्धेच्या युगात तरुणांमधील कौशल्यांचा विकास व्हायला व्हावा, त्यांना विविध क्षेत्रांत संधी मिळावी यासाठी ‘सकाळ’चे यिन हे उत्तम व्यासपीठ आहे. या यिनने राज्यातल्या विविध महाविद्यालयांत निवडणुका घेऊन लोकशाही मूल्य रुजवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील चार हजार महाविद्यालयांतून निवडलेले महाविद्यालयीन अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष, कोअर टीम सदस्य नेतृत्व विकास परिषदेला उपस्थित आहेत. 

परिषदेत डॉ. भरत जेठवाणी आणि त्यांची टीम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. पहिल्या सत्रात शिक्षण विषयावर डॉ. गजानन एकबोटे, सचिन जोशी, सचिन बुरघाटे, शांतीलाल मुथा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची उपस्थिती असेल.

दुपारच्या सत्रामध्ये कामगार, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे तरुणाईशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी यिनचे सदस्य विधानभवनाचा अभ्यास दौरा करणार आहेत. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ६) सकाळी पत्रकारिता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, राजीव खांडेकर आणि आशीष दीक्षित यांची मुलाखत ‘साम’चे संपादक नीलेश खरे हे घेणार आहेत. त्यानंतर शेती विषयावर अंकुश पाडवाले, डॉ. विलास शिंदे, विजयकुमार चोले यांची मुलाखत आदिनाथ चव्हाण हे घेणार आहेत. दुपारनंतर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे युवकांचे मार्गदर्शन करणार आहेत. याच दिवशी यिनच्या मंत्रिमंडळाची निवड करण्यात येणार आहे.

परिषदेच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यिनचे मंत्री कार्याचा लेखाजोखा सादर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com