शिवसेना जाणार सर्वोच्च न्यायालयात? राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काय होणार?
bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray sakal

मुंबई : जर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. वृत्तांनुसार अपक्ष आमदारांचा गट हा कोश्यारी यांच्याकडे जाऊ शकतो. त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सरकार बहुमत गमवेल. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी हेच अपक्ष आमदारांनी ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. (Maharashtra Political Crisis If Governor Ask Floor Test, Then Shiv Sena Approach Supreme Court)

bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
फडणवीसांच्या पत्रानंतर राजकीय हालचालींना वेग, बच्चू कडू येणार उद्या मुंबईत

जर ते राज्यपालांकडे गेले, कोश्यारी यांच्याकडे पर्याय नसल्याने ठाकरे यांना ते बहुमत सिद्ध करण्यास सांगतील. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, याबाबत मला काही माहित नाही. जर अपक्ष आमदार कोश्यारी यांच्याकडे गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यास शिवसेना (Shiv Sena) सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल, असे सावंत यांनी सांगितले. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालय म्हणाले, की विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र करु शकत नाहीत. (Maharashtra Politics)

bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray
भाजप नेते फडणवीसांच्या निवासस्थानी; पाटलांसह शेलार, दरेकरांची हजेरी

तसेच न्यायालयाने बहुमत चाचणीवर कोणतेही मत मांडण्यास नकार दिला. त्यामुळे राजभवन मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगणार नाही. जर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले गेल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com