
Shiv Sena Case: "तर गद्दारांचा गट..."; निकालापूर्वी संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्ट सुनावणार आहे. पण तत्पूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता गद्दारांचा गट संपणार, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळातच आमदारांच्या अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे. (Maharashtra political crisis result group of traitors will be finished says Sanjay Raut)
जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार आज अपात्र ठरले तर गद्दारांचा हा गट संपणार आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आजच्या निकालाकडं सर्वांच लक्ष लागून राहिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्ट आज १६ आमदारांच्या अपात्रतेवर अंतिम निकाल देणार आहे. या निकाल विविध अंगांनी महत्वाचा असणार आहे. कारण यामुळं महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो. तसेच बंडखोर आमदारांसाठी एक धडा देणारा हा निर्णय असेल. ज्याचे परिणाम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील राजकारणावर होणार आहेत.