
Shiv Sena Case: हे पद मी स्वतःहून...कोर्टाच्या निर्णयानंतर भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दणका दिला. भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी कोर्टोचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले आहे. (Shivsena leader bharat gogawale first reaction on SC Hearing appointment pratod illegal )
भरत गोगावले यांची एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून निवड केली होती. ज्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली होती. नार्वेकर यांच्या निर्णयावरही कोर्टाने ताशेरे ओढले.
काय म्हणाले गोगावले?
आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे. कसं बेकायदेशीर ठरवलं आहे ते आमचे विधीतज्ज्ञ पाहतील. आणि जे काही ठरवतील त्यात आम्हाला समाधाना मानावं लागेलं. तसेच आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण हे पद मी स्वतःहून घेतलं नव्हतं. मी स्वतःहून प्रतोद पद मला द्या असं म्हटलं नव्हत. आमच्या सर्व मंत्र्यांनी बसून ठरवलं होतं. सगळ्यांनी ते मान्य केलं. त्यामुळे कोर्टाने कोणत्या मुद्यावरुन माझं पद बेकायदेशीर ठरवलं आहे. आमजे विधीतज्ज्ञ ठरवतील.
न्यायालयानं व्हिपचा अधिकार सुनील प्रभू यांनी जो बजावला तो योग्य होता असे सांगत गोगावले यांची नियुक्ती आणि त्यांचा अधिकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणात व्हिप कुणाचा, त्याचा अधिकार कुणाचा हे सगळ्यात महत्वाचे होते. यामध्ये अधिकृत राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हीपलाच मान्यता अध्यक्षांनी दिली पाहीजे असे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे.