Deepak Kesarkar | केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra political crisis Uday Samant Deepak Kesarkar Narayan Rane

केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसतात. यामुळे राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेत प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, बंडखोर आमदार उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करत प्रवक्तेपदाची जबाबदारीवर स्पष्टीकरण दिले आहे.(maharashtra political crisis Uday Samant Deepak Kesarkar Narayan Rane)

केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, 'मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये असे ' अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम देण्यााचा प्रयत्न केला.

राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता, असा दावा केसरकर यांनी केला आहे.

केसरकरांच्या या वक्तव्यानंतर राणे- केसरकर वाद चिघळला आहे. 'दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे' असं म्हणत निलेश राणेंनी एकेरी उल्लेख करत केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे. आता यावर केसरकर काय उत्तर देतात ते पाहणे उत्सुकत्याचे ठरेल.

Web Title: Maharashtra Political Crisis Uday Samant Deepak Kesarkar Narayan Rane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..