
Maharashtra Politics: मविआच्या सभेपूर्वी CM शिंदे यांच्याकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का
छत्रपती संभाजीनगरात आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मविआला मोठा धक्का दिला आहे.(ncp leaders join Cm Eknath Shinde shiv sena )
गेल्या काही दिवसांपासून या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. अशातच, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार आहे. हे सर्व जण शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेनेत जात आहे. अशी माहिती टी व्ही ९ ने दिली आहे.
संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेला सुरुवात होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.