काँग्रेस - राष्ट्रवादी ठाकरेंच्या पाठिशी | Congress and NCP Support CM Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress and NCP Support CM Uddhav Thackeray

काँग्रेस - राष्ट्रवादी ठाकरेंच्या पाठिशी

मुंबई : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाने महाविकास आघाडी सरकारची उलटगणती सुरू असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास बुधवारी दिला. राज्यातील राजकीय उलथापालथीच्या वेळी आघाडीचे सर्व आमदार सोबत राहतील यासाठी काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ने सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना काँग्रेसने राज्यात निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीला ४४ पैकी ४२ आमदार उपस्थित होते. मंत्री विजय वडेट्टीवार शासकीय दौऱ्यानिमित्त परदेशात असल्याने ते हजर राहू शकले नाहीत. सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. यानंतर कमलनाथ यांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधत पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. (Congress and NCP Support CM Uddhav Thackeray)

ठाकरे अन पवार भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याने सुरक्षित अंतर राखूनच ही भेट झाली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे यांच्या पाठीशी असून सरकार समोर संकट असले तरी यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवा. पक्षांतर्गत कलह असल्याने जो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख म्हणून घ्या. शिवाय तब्येतीचीही काळजी घ्या,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केल्याचे समजते.

‘राष्ट्रवादी’चे नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील , छगन भुजबळ,रामराजे निंबा‍ळकर यांच्यासोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे की न जावे यावर सखोल चर्चा झाली. या बंडाळीने संभाव्य कायदेशीर लढाईचा प्रसंग उद्भवला तर त्याची तयारी कशी असावी, याचे नियोजन देखील ठरल्याचे समजते. शिवसेनेतील बंडखोरी हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याने मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यावर सध्या ‘थांबा आणि पाहा’ची भूमिका घ्यावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदारांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Maharashtra Politics Congress And Ncp Support Sharad Pawar Meet Cm Uddhav Thackeray Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top