maharashtra politics: सुप्रिया सुळेंनी शंभुराज देसाईंच्या कानात केली कुजबुज अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics

maharashtra politics: सुप्रिया सुळेंनी शंभुराज देसाईंच्या कानात केली कुजबुज अन्...

राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक सुप्रिया सुळे आणि शिंदे गटाचे शंभुराज देसाई हे दोघे चर्चेत आले आहे. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.(maharashtra politics Ncp Supriya Sule Shinde Camp Shambhuraj Desai Jayant Patil)

सत्तासंघर्षानंतर राष्ट्रवादी नेते शिंदे गट यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच जयंत पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात शिंदे गटातील नेते आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या.

हेही वाचा: Governor controversy: 'महाराष्ट्र बंद', राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चा निर्णय

एकाच व्यासपीठावर येताच सुप्रिया सुळे आणि शंभुराज देसाई एकमेकांशी गप्पा मारत असल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी देसाईंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर शंभुराज देसाई खो-खो हसत सुटले. इतक्यात शेजारीच उभे असलेले राष्ट्रवादीचे लातूरमधील उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडेही जवळ आले. सुप्रिया सुळे त्यांच्याही कानात काहीतरी कुजबुजल्या. त्यानंतर तिघेही हसताना दिसले.

सुळे आणि देसाई यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांची टीका नैराश्‍यातून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही दिवसांपूर्वी, ईडीचा गैरवापर झाला असता, तर राष्ट्रवादीचे दोन नेते त्याचवेळी जामिनावर सुटले असते. गैरवापर असता तर न्यायालयाने संबंधितांना जामिनावर मोकळे केले असते. वर्ष-दीड वर्षे संबंधितांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे सकृतदर्शनी ते दोषी दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीने गैरवापर कुठे केला? याचे उदाहरण द्यावे, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांना दिलं.

टॅग्स :Supriya Sule