Maharashtra Politics: किरीट सोमय्या अडचणीत येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics Sanjay Raut notice to bjp leader  Kirit Somaiya for defamatory tweet

Maharashtra Politics: किरीट सोमय्या अडचणीत येणार?

भाजप खासदार किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. (Maharashtra Politics Sanjay Raut notice to bjp leader Kirit Somaiya for defamatory tweet )

एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी किरिट सोमय्या यांना संजय राऊतांनी एक नविन नोटीस जारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशी कारवाई करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

काय आहे कारण?

दोन दिवसांपूर्वी, शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये २००० कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. ज्यावर भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“शिवसेना नाव आणि निशाणीसाठी रुपये २००० कोटींचा सौदा झाला” असे संजय राऊत म्हणतात, मला आशा आहे की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचीका करणार आहे, त्यात हा आरोप, माहितीचा उल्लेख करणार.” असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

Thackeray Vs Shinde : …अन् सरन्यायाधीश धावून आले; सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखवलं मराठी पत्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला हिंदुत्व सोडलं. म्हणून नाव ही गेलं आणि निशाण ही गेलं. आता दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन निघाले आहेत तर नामोनिशाण तरी उरणार का?” असंही किरीट सोमय्या यांनी या अगोदर म्हटलेलं आहे.

टॅग्स :Sanjay RautKirit Somaiya