Maharashtra Politics: संजय राऊतांची माघार, 'पवारांबद्दल मी काल जे बोललो त्याचा खेद वाटतो'

अजित पवार हे 'मविआ'तील महत्त्वाचे नेते
sanjay raut news
sanjay raut newsesakal

अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो आहे, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाद्बीक चकमक पाहायला मिळत आहे. राऊतांच्या या यु टर्नवर आता अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ( Sanjay Raut on I regret what I said about Ajit Pawar yesterday )

संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत माध्यमांशी बोलत असताना खेद व्यक्त केला आहे.

sanjay raut news
lok sabha 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेंढीपालनासाठी दहा हजार कोटींची कर्ज योजना प्रस्तावित?

काय म्हणाले राऊत?

माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा हॉट असल्याने आम्ही दोघे पटकन व्यक्त होतो. अजित पवारांबद्दल मी जे बोललो त्याचा मला खेद वाटतो. यापुढे मी ठरवलं संपूर्ण भूमीका ऐकल्याशिवाय मी त्याविषयावर बोलणार नाही. अजित पवार हे मविआतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. असे विधान राऊत यांनी केले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

sanjay raut news
Court: 'तुझी फिगर खूप...', ऑफिसमध्ये महिलेची स्तुती करणाऱ्या बॉसला न्यायालयाने सुनावलं

राऊतांचा पवारांवर नेमका आरोप काय?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले. मीडियात हा क्षण कैद झाला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांना लगावला.

अजित पवार यांचा हा सल्ला संजय राऊत यांना पचनी पडलेला नाही. राऊत यांनी त्यावरून थेट अजितदादांवर खोचक टीका केली आहे. धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com