
आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत? , एकनाथ शिंदेंना पाठिंबा
नाशिक : शिवसेनेतील १९ खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकाही खासदाराने आपण शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितलेले नाही. मात्र ते शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी झाल्यास व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेल्यास त्यांचे भविष्य आणखी सुरक्षित होऊ शकते, असे शिवसेना (Shiv Sena) नेत्याकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics Shiv Sena MPs Also Backing Eknath Shinde)
हेही वाचा: भाजपचा उद्धव ठाकरेंवर इतका राग का?, शिवसेना संपवण्याचे 'कट' कारस्थान
जेव्हा याबाबत शिवसेना खासदाराशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पक्षाची भाजपबरोबर पूर्वी असलेली आघाडी सोयीची होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसशी गैरसोयीचे असल्याचा दुजोरा संबंधित खासदाराने दिला आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा: Maharashtra | बंडखोर शिवसेना आमदारांची हाॅटेलवारी जोरात, जनता मात्र वाऱ्यावर
खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की ते पक्षाबरोबर आहेत. मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
Web Title: Maharashtra Politics Shiv Sena Mps Also Backing Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..