Maharashtra Politics: पडद्यामागे हालचालींना वेग; उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: पडद्यामागे हालचालींना वेग; उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी पक्षाचे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. (Maharashtra Politics Uday Samant to meet Sharad Pawar at Silver Oak )

गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत.

संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अदानी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी उदय सामंत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

दोघांच्यात भेटीत चर्चा काय घडली?

नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्ल सामंत यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे सांगतिले. यावेळी नाट्य परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. इतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व मंत्री मुंबईच्या दिशेने रवाना जाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या घाटकोपरमध्ये ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर 2023’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यभरातून दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.