महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परिक्षेचा निकाल जाहीर

Maharashtra Public Service Commissions Police Sub-Inspection Examination result has been announced
Maharashtra Public Service Commissions Police Sub-Inspection Examination result has been announced

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक गट- ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 650 पदांसाठी नोव्हेंबर 2017 मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यता आला.

या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमित खोत हा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर बीड जिल्ह्यातील विष्णुपंत तिडके याने मागस प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महिला प्रवर्गातून धुळे जिल्ह्यातील अश्‍विनी हिरे ही राज्यात पहिली आली आहे. 

आयोगामार्फत घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयूक्त (पूर्व) परीक्षेसाठी राज्यातील तीन लाख 30 हजार 909 उमेदवारांना प्रवेश घेतला होता. यातून पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी 10 हजार 031 उमेदवारांची निवड झाली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी दोन हजार 763 उमेदवार पात्र ठरले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com