Maharashtra Rain Update : राज्यातील 'या' जिल्ह्यात गडगडाटासह बरसणार अवकाळी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : राज्यातील 'या' जिल्ह्यात गडगडाटासह बरसणार अवकाळी पाऊस

राज्यातील शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसलेले आहेत. यादरम्यान राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव, ढगाळ आकाश तसेच पुढच्या २ ते ३ तासात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज रविवारी दुपारी बारा वाजेच्या नंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी परिसरात अनेक साहित्य उडाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहरात आठवडा बाजार असल्याने शेतीमाल विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक सोबतच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने (Monsoon Update) हजेरी लावली. धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झााला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात असलेल्या धडगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गुजरात राज्यमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात वादळी वारे आणि हलका पाऊस पुढील काही तासात पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार वादळ वारा सुरू झाला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे.