यावर्षी परतीचा पाऊस महाराष्ट्रात सर्वाधिक बरसला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले.

पुणे-  या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरशः झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे. 

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात २३५ मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या  (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते. 

या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात २०१५ ते २०१९ या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर २०१५ मध्ये पुण्यात ७ दिवसांत ७६.७. मिमी, २०१६ मध्ये ७ दिवसांत ८०.४ मिमी, ऑक्‍टोबर २०१७ मध्ये ११ दिवसांत १८०.१ मिमी, तर ऑक्‍टोबर २०१८ मध्ये ७ दिवसांत ३६.१ मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

चक्रीवादळाचा परिणाम
दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, ‘क्‍यार’ आणि ‘महा’ या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra received highest returning monsoon this October

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: