esakal | राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५५ लाख ९७ हजार ३०४ आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ९५.४५ टक्के झाले आहे.

राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमालीची घटल्याने विविध राज्यांनी अनलॉक प्रक्रियेला सुरवात केली आहे. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्याकाही दिवसांपासून पॉझिटिव्ह रेट कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. राज्यात बुधवारी (ता.९) दिवसभरात १०,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाख ६३ हजार ८८० झाली आहे. बुधवारी दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. (Maharashtra reports 10,989 new case and 261 deaths in the last 24 hours)

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५५ लाख ९७ हजार ३०४ आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ९५.४५ टक्के झाले आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, येथे ३१ मृत्यू नोंदवण्यात आले. मृतांचा एकूण आकडा १ लाख १ हजार ८३३ इतका आहे. राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ६१ हजार ८६४ सक्रिय रुग्ण आहेत.

बुधवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ७१ लाख २८ हजार ९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ६३ हजार ८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत २ कोटी ४६ लाख ८१ हजार ४६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी दिवसभरात २ लाख ६७ हजार ४०४ नागरिकांना लस देण्यात आली.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.९) केंद्र सरकारला उद्देशून विशेष टिप्पणी केली आहे. सध्या समाजाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या कोरोना व्हायरसकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्हायरस बाहेर येण्याची वाट पाहणाऱ्यांसारखा आहे. पण सीमेवर उभे राहण्याऐवजी सर्जिकल स्ट्राइक करण्यासारखा दृष्टिकोन असला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.