महाराष्ट्रात आढळले नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण

महाराष्ट्रात आढळले नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण

कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात आल्याचं चित्र झाल्यानंतर महाराष्ट हळू-हळू अनलॉक होत आहे. जिल्हास्तरावरील निर्बंध शिथिल केले जात आहेत. अनलॉक होत असतानाच चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण महाराष्ट्रत आढळले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथून घेतलेल्या नमुण्यामध्ये SARS-CoV-2 डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या भागातील अनेक नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत. हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे, याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. हा विषाणू डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ या कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाला आहे. डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच व्हेरियंट कारणीभूत होता. उपलब्ध डेटानुसार, हा व्हेरियंट मोनोक्लोनल अँटिबॉडीला निष्क्रिय करतो. या व्हेरियंटवर अजून अभ्यास केला जात आहे.

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या टास्क फोर्सचे (task force) सदस्य तात्याराव लहाने म्हणले की, ' नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी येथे आम्हाला डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर आम्ही आणखी काही चाचण्या तपासणीसाठी पाठवल्या आहेत, या चाचण्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातरा, रत्नागिरी या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. इतर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.'

राज्यात आढळलेल्या सात डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये पाच रत्नागिरी येथील आहेत. गेल्या आठवड्यात येथील पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा जास्त होता. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.8 टक्के असताना रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी रेट 13.7 टक्के इतका होता. सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या महाराष्ट्रातील अव्वल दहा जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा समावेश होतो. रत्नागिरीमधील डॉक्टर संघमित्रा गावडे म्हणाल्या की, डेल्टा प्लस व्हेरियंट आढळलेलं गाव त्वरित सील करण्यात आलं आहे. पाच पैकी दोन रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत.'

डेल्टा प्लस बाबत महत्वाची बाबी -

डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ व्हेरियंटमध्ये म्युटेशनमुळे नवा डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. या व्हेरियंटमुळं आजार किती गंभीर होईल हे कळून येत नाही. डेल्टा प्लस किंवा AY.1 या व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नाही. याची खूप अधिक प्रकरणं समोर न आल्यानं हा अद्याप भारतात चिंतेचा विषय नाही. मात्र हलगर्जीपणा केल्यास कोरोनाचा नवीन व्हेरियंट धोकादायक ठरु शकतो.

अनलॉक होत असताना नवीन संकट -

महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, प. बंगाल आणि कर्नाटक या राज्यात लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. तर काही राज्यातील परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लागोपाठ आठ दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या खाली आढळली आहे. अशा परिस्थिती देशात कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, अशा परिस्थितीत ‘डेल्टा प्लस’ हा नवा विषाणू आढळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com