esakal | रेमडेसेविर इंजेक्शनची पुन्हा चर्चा; राज्यानं केंद्राकडे केली महत्वाची मागणी

बोलून बातमी शोधा

remdesivir}

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेमडेसेविर इंजेक्शनची पुन्हा चर्चा; राज्यानं केंद्राकडे केली महत्वाची मागणी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोविड -१९ आजारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसेविर या इंजेक्शनची दरनिश्चिती करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्य सरकारने नक्की काय केलीय मागणी?

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केंद्र सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवला असून यामध्ये सरकारने रेमडेसेविर इंजेक्शनच्या १०० मिलीग्रॅम व्हॉयलची एमआरपी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अचानक मागणी वाढल्याने या इंजेक्शन्सचा पुन्हा काळाबाजार होऊ नयेत म्हणून सरकारने केंद्राकडे ही मागणी केल्याचं बोललं जात आहे.