सव्वाशे विद्यार्थी शंभर नंबरी 

सव्वाशे विद्यार्थी शंभर नंबरी 

पुणे - दहावीच्या परीक्षेत यंदा 89.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरात तब्बल 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये लातूर विभागातील 70, तर त्याखालोखाल औरंगाबाद विभागातील 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुमारे 63 हजार 331 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.67 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून, तो 96 टक्के आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी असून, तो 85.97 टक्के आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 57 विषय होते, त्यातील 11 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात नऊ विभागीय मंडळांतून दहावीसाठी 16 लाख 36 हजार 250 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एक लाख 14 हजार 41 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी एक लाख 13 हजार 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 49 हजार 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात नियमित विद्यार्थिनींचा निकाल 91.97 टक्के असून, विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचा निकाल 4.70टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 

टक्केवारी : विद्यार्थ्यांची संख्या 
90 टक्के आणि त्यापुढे : 63,331 
85 ते 90 टक्के : 86,453 
80 ते 85 टक्के : 1,13,802 
75 ते 80 टक्के : 1,40,209 
70 ते 75 टक्के : 1, 62,788 
65 ते 70 टक्के : 1,77,377 
60 ते 65 टक्के : 2,02,754 

विभागनिहाय 100 टक्के गुण मिळविलेले विद्यार्थी 
पुणे : 4, मुंबई : 4, कोकण : 4, नागपूर : 2, औरंगाबाद : 23, कोल्हापूर : 11, अमरावती : 6, नाशिक : 1, लातूर : 70 

राज्यात 596 कॉपी प्रकरणे 
- दहावीच्या परीक्षेदरम्यान 596 कॉपी प्रकरणे पकडली गेली. औरंगाबादमध्ये सर्वाधिक 138 प्रकरणे, तर अमरावतीमध्ये 103 प्रकरणे आढळून आली. पुण्यात कॉपीची 81 प्रकरणे आढळली. 

कला व क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थी 
शास्त्रीय नृत्य : 1,447), गायन : 1,010, वादन : 983, लोककला : 1,384, नाट्य : 336 आणि चित्रकला : 1,61,021 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण 100 टक्के गुणांच्या अधीन राहून देण्यात आले. 

निकालातील महत्त्वाचे मुद्दे : 
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के 
- मार्च 2017च्या तुलनेत यंदाच्या निकालात किरकोळ वाढ 
- शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या : 33 
- खेळाच्या कोट्यातून अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थी : 3, 849 

- फेरपरीक्षा 17 जुलैपासून 
दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना "एटीकेटी'ची सुविधा लागू राहील. यामुळे विद्यार्थ्यांचा अकरावीचा प्रवेश तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. येत्या 17 जुलैपासून दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा सुरू होणार आहे. फेरपरीक्षेसाठीची प्रवेशप्रक्रिया मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. 

- गुणपत्रिका मिळण्याबाबत अनिश्‍चितता 
दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असला तरी, अद्याप गुणपत्रिका मिळण्याची तारीख जाहीर झालेली नाही. गुणपत्रिका मिळण्याची तारीख येत्या दोन दिवसांत कळविण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. 

विभागनिहाय निकाल 
विभागीय मंडळ : परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : टक्केवारी 
पुणे : 2,68,088 : 2,46,855 : 92.08 
नागपूर : 1,70, 314 : 1,46,418 : 85.97 
औरंगाबाद : 1,88,319 : 1,67,244 : 88.81 
मुंबई : 3,38,609 : 3,06,151 : 90.41 
कोल्हापूर : 1,43,823 : 1,35,018 : 93.88 
अमरावती : 1,70,899 : 1,47,809 : 86.49 
नाशिक : 2,00,054 : 1,74,892 : 87.42 
लातूर : 1,10,828 : 95, 645 : 86.30 
कोकण : 37,679 : 36,171 : 96.00 

नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 
तपशील : मुले : मुली : एकूण 
नोंदणी झालेले : 9,72,385 : 7,77,906 : 17,50,291 
परीक्षा दिलेले : 9,66,957 : 7,74,734 : 17,41,691 
उत्तीर्ण : 8,07,507 : 6,97,928 : 15,05,435 
उत्तीर्णची टक्केवारी : 83.51 : 90.09 : 86.44

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com