दहावीचा टक्का घसरला; निकाल 77.10 टक्के

दहावीचा टक्का घसरला; निकाल 77.10 टक्के

पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे. 

नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 47 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. निकालाचा 2011 पासूनचा आढावा घेतला असता, दरवर्षी निकालातील चढ-उतार दोन ते तीन टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित होते. यात सर्वांत कमी निकाल 2011 मध्ये 76.06 टक्के लागला होता. 

कोकण विभागाची बाजी 
यंदा राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के, तर नागपूर विभागाचा सर्वांत कमी 67.27 टक्के आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 82. 82 टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल 72.18 टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 10.64 टक्‍क्‍यांनी जास्त आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीची परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती. या अभ्यासक्रमाप्रमाणे जवळपास 58 हजार 665 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 18 हजार 958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांचा निकाल टक्केवारी 32.32 टक्के इतकी आहे. खासगीरीत्या 30 हजार 861 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील 34.76 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

वर्ष : निकालाची टक्केवारी (नियमित विद्यार्थी) 
2011 : 76.06 
2012 : 81.32 
2013 : 83.48 
2014 : 88.32 
2015 : 91.46 
2016 : 89.56 
2017 : 88.74 
2018 : 89.41 
2019 : 77.10 


दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये 
- 100 टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या : 1,794 
- शून्य टक्के निकाल असलेल्या शाळा : 103 
- शून्य ते 10 टक्के निकाल असलेल्या शाळा : 209 
- 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी : 28,516 
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल : 83.05 टक्के 
- शंभर टक्के गुण मिळालेले विद्यार्थी : औरंगाबाद-3, अमरावती-1 आणि लातूर-16 (एकूण 20) 

विभागनिहाय निकालाची टक्केवारी 
पुणे : 82.48 
नागपूर : 67.27 
औरंगाबाद : 75.20 
मुंबई : 77.04 
कोल्हापूर : 86.58 
अमरावती : 71.98 
नाशिक : 77.58 
लातूर : 72.87 
कोकण : 88.38 

कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट गाइडमध्ये सहभागी सुमारे एक लाख 36 हजार 979 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले. 
सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी. 
शास्त्रीय नृत्य : 1,757 
गायन : 1,466 
वादन : 1,130 
लोककला : 4,874 
नाट्यकला : 49 
चित्रकला : 1,11,975 
क्रीडा : 15,692 
एनसीसी : 2 
स्काउट गाइड : 34 

मराठीच्या निकालात लक्षणीय घसरण 
मराठी प्रथम भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.54 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी 90.96 टक्के विद्यार्थी मराठी विषयांत उत्तीर्ण झाले होते, यंदा 78.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी ही द्वितीय किंवा तृतीय भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालातही घट झाली आहे. तसेच, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. 

विषय : 2019 : 2018 
मराठी (प्रथम भाषा) : 78.42 : 90.96 
हिंदी (प्रथम भाषा) : 82.32 : 89.70 
इंग्रजी (प्रथम भाषा) : 90.99 : 97.86 
मराठी (द्वितीय/तृतीय भाषा) : 84.55 : 93.06 
इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा) : 80.24 : 90.12 
गणित : 89.90 : 89.13 
विज्ञान आणि तंत्रज्ञान : 92.15 : 94.37 
सामाजिक शास्त्र : 88.80 : 96.28 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com