SSC Result 2023: 10वी बोर्डाच्या निकालाबाबत मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result 2023

SSC Result 2023: 10वी बोर्डाच्या निकालाबाबत मोठी अपडेट

महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नाही पण निकालाच्या तारखांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Maharashtra SSC Result 2023 Class 10 board result to be out soon at mahahsscboard in )

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

10वी चा निकाल कसा पाहाल?

अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.

सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.

लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा.