Maharashtra : एसटीचे आंदोलन भाजपकडून ‘हायजॅक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST
एसटीचे आंदोलन हायजॅक

एसटीचे आंदोलन भाजपकडून ‘हायजॅक’

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी मुंबईसह राज्यभरात पुकारलेले आंदोलन भाजपने ‘हायजॅक’ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर मार्ग काढण्याची हमी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली, तर शेवटच्या टप्प्यांतील लढा यशस्वी व्हावा, म्हणून भाजप नेत्यांनी आझाद मैदान सोडलेले नाही. मात्र, या मुद्यावरून ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांत नवा संघर्ष दिसत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना भाजपच्या बड्या नेत्यांनी बळ दिले आहे. मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार असल्याचे सांगत, या मंडळींनी आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यातून रोज वेगवेगळे नेते आंदोलनात सहभागी होत आहेत.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

तर माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर आपला मुक्काम आझाद मैदानावर ठेवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर दोन दिवसांत परब यांनीही काही मागण्यांवर सकारात्मक संकेत दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आंदोलनाची लढाई प्रतिष्ठेची करीत, भाजप नेते रविवारी पुन्हा नव्या जोमाने आंदोलनात सहभागी झाले त्यावरून भाजपला बळी पडू नका, असे आव्हान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले.

loading image
go to top