काँग्रेसचा 'हात' शिवसेनेच्या सोबत !

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 8 जून 2018

कामगार संपावर तर एसटी कर्मचारी काँग्रेसकडून वेतनवाढीवरून जल्लोश !

मुंबई : वेतनवाढीच्या विरोधामध्ये एसटी कामगारांनी अघोषीत संप पुकारला असतानाच एसटी कामगार काँग्रेसने मात्र जल्लोशाचे फ्लेक्स लावले आहेत. एसटी कामगार काँग्रेसकडून शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या फोटो लावून फ्लेक्स झळकवला आहे. यावरून एसटी कामगारांच्या प्रश्नावर काँग्रेसचा "हात" शिवसेनेच्या सोबत असल्याचे दिसत आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्धापन दिनाचा मुहूर्तसाधत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषीत केली. ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी महामंडळाकडे 9 जून 2018 पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज भरावा व असा अर्ज स्विकारताना चित्रिकरण होणार असल्याने एसटी महामंडळाच्या कर्माचाऱ्यांमध्ये खदखद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियात संपाची हाक देत महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचवेळी एसटी कामगार काँग्रेसने मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे फ्लेक्स लावत जल्लोश केला आहे. एस टी कर्मचारी काँग्रेसचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांचा फोटो व शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे फोटो झळकावतं ऐतिहासिक वेतनवाढ असल्याची माहितीही या फ्लेक्सवर देण्यात आली आहे.

Web Title: maharashtra st employee strike and congress with shivsena