esakal | SSC Result: जाणून घ्या यंदाच्या निकालाची वैशिष्ट्य
sakal

बोलून बातमी शोधा

ssc result

SSC Result: जाणून घ्या यंदाच्या निकालाची वैशिष्ट्य

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: विद्यार्थ्यांच्या (students) शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल जाहीर (ssc result) झाला आहे. ऐतिहासिक म्हणता येईल, अशा स्वरुपाचा यंदाचा दहावीचा निकाल आहे. दहावीची परिक्षा होणार होती, त्यावेळी कोरोना व्हायरसची (corona virus) दुसरी लाट (second wave) प्रभावी झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे यंदा दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. (Maharashtra state board ssc result 2021 declared know special features about this year 10 th result dmp82)

जाणून घ्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्य

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,७५,८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,७५,७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५,७४,९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

हेही वाचा: कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८२८०२ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२६७४ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ७४६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी १०.२५ आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१००%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९९.८४ %) आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२% ने जास्त आहे.

हेही वाचा: दीड वर्षानंतर भरल्या शाळा, विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % लागला आहे.

एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६४८६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६९८८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील २२७६७ शाळांतून १६५८६१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२३८४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.

सन २०२१ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत ४.६५% जास्त आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २८४२४ एवढी अर त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.४५ आहे.

loading image