राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला

Budget
Budget

मुंबई - मागील वर्षी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते; मात्र या वेळी हे अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. आज विधानभवनात संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीची बैठक घेण्यात आली. गिरीश बापट खासदार झाले असून अद्याप खासदारकीची शपथ घेतली नसल्याने ते मंत्रिपदावर कायम आहेत. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा कालावधी व कामकाज ठरवण्यात आले. हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून प्रत्यक्ष कामकाज कामकाज 12 दिवस होणार आहे.

या अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प 18 जूनला मांडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर आचारसंहितेमुळे अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. आता विधानसभा निवडणुकांअगोदरचे हे अखेरचे अधिवेशन असल्याने अर्थसंकल्पात राज्य सरकार घोषणा व योजनांचा पाऊस पाडेल असे मानले जाते. अर्थसंकल्पावर 21 ते 24 जूनदरम्यान चर्चा होईल; तर राज्यपालांच्या अभिभाषणावर 19 व 20 जून रोजी चर्चा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com