esakal | Breaking: राज्यात लॉकडाऊन वाढणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

बोलून बातमी शोधा

LOCKDOWN

Breaking: राज्यात लॉकडाऊन वाढणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई- राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी 1 मेपर्यंत लॉकडाऊन लागून करण्यात आला होता. पण, राज्यातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता तो आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

हेही वाचा: १ मे पासून लसीकरण सुरू होणार नाही- राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा प्रकोप अजून थांबलेला नाही. दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लॉकडाऊनच्या काळात मिळालेला नाही. लोक सर्रासपणे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहेत. अशात राज्यात लॉकडाऊन वाढवला जाण्याची दाट शक्यता होती. राजेश टोपे यांनी हीच शक्यता बोलून दाखवली. लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय जवळजवळ निश्चित आहे. पण, तो किती दिवस वाढवायचा याबाबत अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

राजेश टोपे यांनी राज्यात 1 मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबतही मोठं वक्तव्य केलंय. 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे लसीकरण करणे नियोजित असले तरी तसं करणे शक्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. राज्यात लशींचा तुटवटा आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचे लसीकरण करण्यात येणार नाही. वयानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. त्यांनंतरच लस देण्यास सुरुवात होईल. शिवाय सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण मोफत होईल, पण खासगी हॉस्पिटल्समध्ये लशीसाठी पैसे मोजावे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.