तमिळनाडूच्या दु:खात महाराष्ट्र सहभागी- फडणवीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - 'जयललितांचा प्रवास हे एक वादळी युग होतं. त्या बहुप्रतिभासंपन्न आणि जनतेच्या नेत्या होत्या. त्यांच्या निधनाने तमिळनाडूच्या जनतेवर मोठा आघात झाला असून देशाची अपरिमित हानी झाली आहे. तमिळनाडूच्या दु:खात महाराष्ट्र सहभागी आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) विधानसभेत शोकप्रस्ताव सादर केला.

फडणवीस म्हणाले, "जयललितांनी अनेक आव्हानांना सामोरं जात स्वतःची प्रतिमा उंचावत नेली. राजकीय व्यवस्थेत जनतेचं एवढं प्रेम मिळणं ही आश्‍चर्याची गोष्ट. तमिळ लोकांना त्या आपल्या कुटुंबातील वाटत. वादात राहूनही जयललितांची प्रतिभा व निर्णयक्षमता कायम राहिली. भारताचा राजकीय इतिहास जयललितांशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. प्रत्येक केंद्र सरकारवर जयललितांचा प्रभाव पडला.
त्या बहुप्रतिभासंपन्न, जनतेच्या नेत्या जयललिता होत्या. तमिळनाडूच्या जनतेवर मोठा आघात. देशाची अपरिमित हानी. तमिळनाडूच्या दुःखात महाराष्ट्र सहभागी आहे.'

'जयललितांच्या निधनामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्या धैर्य आणि चिकाटी असलेल्या एक उत्तम प्रशासक होत्या. खऱ्या क्रांतिकारी नेत्या म्हणून त्यांची इतिहासात नोंद राहील', अशा शब्दांत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Web Title: Maharashtra is with Tamilnadu : Fadnavis